इक्बाल जमादार, संगलट( खेड)
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर फर्टिलायझर कंपनीच्या आवारात टेंम्पो मागे घेताना झालेल्या अपघातात अज्ञात टेंम्पो चालकाविरोधात येथील पोलीसात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोच्या पाठीमागे कोण आहे याची खातरजमा न करता अविचाराने आपल्या ताब्यातील टेंम्पो भरघाव वेगाने पाठीमागे घेतल्याने पाठीमागे असलेला कंपनीचा कामगार लखू शिवा मांडी वय 21 रा. झारखंड याला जोराची धडक बसली.
त्याच्या शरीरावरून टेंम्पोचे मागील उजवे बाजूचे चाक जावून तो टेम्पोखाली चिरडला गेला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात टेंम्पो चालकाविरोधात खेड पोलीसात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवार दि 1 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुष्कर कंपनीच्या आवारात घडली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.
या अपघाताविषयी तक्रारदार सतिशकुमार रामधनी कोटी यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून 407 टेंम्पो नंबर एमएच 08 H 3069 हा मालवाहतूक टेंम्पो लोटे औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर फर्टिलायझर कंपनीच्या आवारात चालक चालवत होता. याच आवारात टेंम्पो भरघाव वेगाने मागे घेताना टेंम्पोच्या पाठीमागे कोण आहे वा कसे याची खातरजमा न करता भरघाव वेगाने, अविचाराने मागे घेण्याच्या नादात मयत कामगाराला टेंम्पोची धडक बसून त्याच्या शरीरावरून टेंम्पो गेल्याने मयत कामगाराचा टेंम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना वर नमूद तारखेच्या वेळी सकाळी 10 वाजता घडली. याबाबत चालकाविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा येथील पोलीसात दाखल करण्यात आला आहे.