(मुंबई)
किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वृत्तवाहिनी शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. लोकशाही वृत्तवाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता आदेश प्राप्त झाल्याची सांगण्यात आले आहे. वृत्तवाहिनीचे संपादक मंडळ सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणात संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
किरीट सोमय्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस आली होती. या नोटीसीला उत्तरही देण्यात आलेले होते. तरीही आम्हाला पुढील 72 तास चॅनेल बंद करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून 72 तासांसाठी लोकशाही चॅनेल बंद करण्यात आलेलं आहे. सूचनांचे आम्ही पालन करुच, पण, आमची बाजू ऐकून घेण्याची अपेक्षा होती. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु, आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचा एक प्रकार आहे. याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती कमलेश सुतार यांनी दिली आहे.