(निवोशी-गुहागर/उदय दणदणे)
कोकणातील लोकप्रिय अशी कलगी-तुरा या लोककलेचा माध्यमातून समाजप्रबोधनपर मनोरंजन करत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले स्वर्गीय कै. तुकाराम मानकर यांच्या जाण्याला २७ जून रोजी एक वर्ष दुःखदायक कालावधी पूर्ण होत असताना आजही त्यांची आठवण क्षणोक्षणी येत राहते. कै.तुकाराम मानकर हे शक्ती-तुरा लोककला जोपासणारे लोककलेतील भारदस्त आवाजाचे शाहीर अशी त्यांची ख्याती होती.
लोककलेचे खरे उपासक आणि विविध पुरस्कारांचे मानकरी ठरत २६ ऑगस्ट २००४ रोजी अखिल भारतीय शाहिर परिषद मुंबईतर्फे अध्यक्ष पद्मश्री शाहिर साबळे यांच्या शुभहस्ते “महाराष्ट्र शाहिर गौरव भुषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे “रायगड भूषण पुरस्कार”,”कोकण रत्न पुरस्कार”,”कुणबी समाज गौरव पुरस्कार”,”जीवन गौरव पुरस्कार”,”महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार”,”आदर्श शाहिर पुरस्कार” असे अनेक गौरव पुरस्कार त्यांच्या नावे जमा आहेत.
२७ जून २०२१ रोजी संपूर्ण कोकण भूमी सह महाराष्ट्राला, शिष्य मंडळी , शाहीर वर्ग, व हितचिंतक यांना धक्का बसणारी अशी घटना जे घडू नये ती गोष्ट घडली, कै. तुकाराम मानकर यांनी अखेरचा निरोप घेतला. महाराष्ट्र गौरव भूषण व रायगड भूषण सन्मानित झालेले कै. तुकाराम मानकर या लोककलेतून मुक्त झाले. ह्या दुःखातून शिष्य मंडळी ह्यांना सावरता सावरता १ वर्ष झाले, आणि म्हणून हे सर्व दुःख सावरत असताना अशा उत्तुंग कलावंताला, आदर्श शाहिरी व्यक्तिमत्वाला प्रथम पुण्यतिथी श्रद्धांजली म्हणून हरीओम कलापथक मंडळ आणि सहकारी, सर्व शाहीर वर्ग आणि हितचिंतक ह्यांच्या सहकार्याने रविवार दिनांक. २६ जून रोजी दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत कुणबी ज्ञाती ग्रह (वाघे हॉल) सेंन्ट झेविअर स्ट्रीट परेल (पू ) मुंबई.४०००१२ येथे प्रथम पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वांनी कै. तुकाराम मानकर ह्यांना श्रद्धांजली म्हणून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.