(मुंबई)
लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रत्येक प्रवाशाची या लोकल ट्रेनसोबत खूप भावनिक नातं आहे. ऊन्हाळा, हिवाळा, पावसाळा, वर्षाचे बाराही महिने ही लोकल ट्रेन सुरु असते. या लोकल ट्रेनचं महत्त्व शब्दांमध्ये सांगणं खूप कठीण आहे. धावत्या लोकलमध्ये बेली डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर काही प्रवाशांनी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लोकल ट्रेनमध्ये भजन होतं, गप्पा गोष्टी होतात, माणुसकी जपली जाते. भर गर्दीत स्त्रियांना जागा मोकळी करुन देण्याचा संवेदनशीलपणा येतो. तसेच दगदगीतून नको असणारा संतापही कधीतरी येतो. पण या लोकल ट्रेनमधल्या बऱ्याच गोष्टी व्हायरलही होतात. सध्या लोकल ट्रेनमधला असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी, भांडणं या व्यतिरिक्त आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. तो व्हिडीओ म्हणजे एक तरुणी अतिशय सुरेख असा बेली डान्स लोकल ट्रेनमध्ये करत आहे.
सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत तरुणी लोकल ट्रेनमध्ये बेली डान्स करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान हा व्हिडीओ काढण्यात आलाय. या व्हिडीओत पाहिल्यावर ट्रेनमध्ये गर्दी दिसत नाहीय. याचाच अर्थ हा व्हिडीओ लोकल ट्रेनमध्ये दिवसा दुपारच्या वेळी काढण्यात आलाय. लोकल मधील व्हायरल होणारे व्हिडिओ काही नवीन नसले तरी, या विशिष्ट घटनेने सांस्कृतिक धारणा, सार्वजनिक वर्तन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चोख राखण्यात अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण करणारी आहेत.
लोकल ट्रेनमध्ये धिम्या मार्गावर दुपारच्या वेळी फार कमी गर्दी असते. याच गोष्टीचा उपयोग करुन तरुणीने बेली डान्सचा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ @mumbaimatterz या एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 20 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.
Entertainment
Now Belly Dancing inside Mumbai Local Train.
It seems #MumbaiLocal Trains are the most happening place..to showcase talent.
Locations seems to be @Central_Railway between Sandhurst Road & Masjid stations.@drmmumbaicr @RailMinIndia @RailMinIndia pic.twitter.com/LI1vFchnHw
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 19, 2023