(खवटी / राजेंद्र दळवी)
26/11 चा मुंबई शहरावरील दहशतवादी हल्ला आजही अंगावर शहारा आणतो. त्या घटनेच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. अनेक पोलिस अधिकारी, मुंबई पोलिस शहीद झाले. शेकडो लोकं मृत्यूमुखी पडले. कित्येकांनी आपले सर्वस्व गमावलं. या भयावहं घटनेला २६ नोव्हेंबर २०२२ ला १४ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आज दापोली तालुक्यातील लोकमान्य टिळक विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज चिखलगाव येथे संस्थेचे अध्यक्ष श्री राजा दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली “याद करो कुर्बाणी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी संस्थेच्या सर्व विभागातील कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांकडून शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्री. ढेरे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. गरंडे यांनी अधिक मार्गदर्शन केले. तसेच श्री सौरभ आणि श्री आदीत्य यांनी विद्यार्थ्यांसमोर शहिद तुकाराम ओंबाळे यांच्यावरील टेलिफिल्म प्रदर्शित केली. तसेच व्हिडीओद्वारे या संपूर्ण घटनेची फिल्म दाखवण्यात आली. यावेळी विद्यार्थी खूप भावूक झाले होते.
या कार्यक्रमाला प्रशालेचे सर्व प्राध्यापक, माध्यमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थेच्या सौ. प्रीती पेवेकर-कोळंबे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.