(रत्नागिरी)
श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे, श्रमिक विद्यालय, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा दिमाखदारअमृत महोत्सवी सोहळा डोळ्याचे पारणे फिटावे असा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याची सुरुवात दिनांक ७ ऑगस्ट क्रांती दिन पासून सुरू होऊन यामध्ये विविध उपक्रमांनी, रॅली, विविध स्पर्धा या माध्यमातून या सोहळ्याची रंगत वाढवण्यात आली .
दि.१३ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी श्रमिक विद्यालयाचा विद्यार्थी इयत्ता दहावी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी कुमार साहिल लाखन यांच्या हस्ते ध्वजारोहाणाने झाली. यानंतर महाविद्यालय ते शिवार आंबेरे ग्रामपंचायत अशी भव्य सन्मान रॅली आयोजित करण्यातआली. ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा व राष्ट्रभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम घेऊन या अमृत महोत्सवी सोहळ्याची रंगत वाढवण्यात आली.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्याचबरोबर पदवी परीक्षेत तीनही शाखेमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच अमृत महोत्सवाच्या विविध स्पर्धेमध्ये यश संपादित केलेले विद्यार्थी या सर्वांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते केला गेला. या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी राष्ट्राबद्दल आदराची भावना निर्माण करून राष्ट्र अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा समजून घेताना स्वातंत्र्याची आंदोलने व सामाजिक क्रांतीचा आंदोलने हे ही समजून घेतले पाहिजे सामाजिक क्रांतीचा आंदोलने आजही तसेच चालू आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी भारतात सामाजिक क्रांती होणे किती गरजेचे आहे याचा समर्पक शब्दात आढावा घेऊन राष्ट्र कार्याला तरुणांनी सज्ज व्हावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आपली मनोगते व्यक्त करून देशाप्रती असणारा आदरभाव व्यक्त केला. त्याचप्रमाणे समूहगीत गायनातून माय भूमीचा गुणगौरव केला. या कार्यक्रमाला मुंबई कमिटीचे कोषाध्यक्ष श्री राम सारंग तसेच शिक्षण प्रेमी सुदाम आंब्रे हे उपस्थित होते. श्रमिक किसान सेवा समितीचे सचिव व श्रमिक विद्यालय लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे चे प्राचार्य श्री मधुकर थुळ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री राकेश आंबेकर, शिवार आंबेरे गावचे प्रथम नागरिक श्री.राजन रोकडे ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रेमी, ग्रामस्थ, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका समृद्धी कुड , प्रास्ताविक प्राध्यापिका कल्पना मेस्त्री, बक्षीस वितरण सहाय्यक शिक्षक श्री. दिवाकर तरळ, आभार सहाय्यक शिक्षिका श्रीमती पुजा बिर्जे यांनी मानले.