(रत्नागिरी)
राजश्री शाहू महाराजांची 148 वी जयंती लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे येथे अध्यक्ष श्री.नंदकुमार मोहिते यांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयात उत्कृष्ट गुण मिळालेल्या 12 वी तील मुलांचा सत्कार करण्यात आला
शाखा – कला
1) प्रथम क्रमांक, कुमारी – श्रेया सुरेश पेजे
2) द्वितीय क्रमांक, कुमार – अभय बाळकृष्ण बिर्जे
3) तृतीय क्रमांक, कुमारी – सिद्धी चंद्रकांत चंदूरकर
शाखा – वाणिज्य
1) प्रथम क्रमांक, कुमारी – क्रांती सूर्यकांत गुरव – 72.17%
2) द्वितीय क्रमांक, कुमारी – प्रगती संजय जुवळे – 69.00%
3) तृतीय क्रमांक, कुमारी – भक्ती दीपक गुरव – 68.50%
शाखा – विज्ञान
1) प्रथम क्रमांक, कुमारी – पायल रोहिदास गोराठे – 74.00%
2) द्वितीय क्रमांक, कुमारी – अवंतिका चंद्रशेखर आडविरकर – 72.83%
3) तृतीय क्रमांक, कुमारी – प्राजक्ता प्रकाश राड्ये -72%
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी
तसेच श्रमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी
1) प्रथम क्रमांक, कुमार- साहिल संतोष लाखण,
2) द्वितीय क्रमांक, कुमार- राज राजेंद्र आंबेरकर
3) तृतीय क्रमांक, कुमारी-वेदिका निलेश बावकर,
या सर्वांना पेन व राजश्री शाहू महाराज विचार व वारसा हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. राजश्री शाहू महाराज जयंती दिन म्हणजे समता दिन म्हणून संबोधला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षणाची पदवी घेऊन, ज्यावेळी त्यांचे भारतात आगमन झाले, त्यांचे स्वागत व आनंद व्यक्त करताना राजश्री शाहू महाराजांनी आपल्या नगरीमध्ये हत्तीवरून साखर वाटली. शिक्षणासाठी आपल्या राज्य कारभाराला पाव हिस्सा खर्च करणाऱ्या, भारत देशातील पहिला राजा कोल्हापूर करवीर नगरी मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्माला आला ही महाराष्ट्र जनतेला अभिमानाची बाब आहे.
18 व्या शतकात प्राथमिक व उच्च शिक्षण मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारा भारतातील पहिला राजा आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेला काम करण्याच्या सूचना देऊन एखाद्या पालकाने पाल्याला शाळेत पाठवले नाही, तर दंड आकारून, सवलतीचे शिक्षण देणारा पहिला राजा. याचा आदर्श सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा आदर्श निर्भिडपणे मांडला पाहिजे. सामाजिक उन्नतीला बळ दिले पाहिजे असे परखड विचार संस्थापक/अध्यक्ष- श्री. नंदकुमार मोहिते यांनी मांडून राजश्री शाहू महाराजांच्या विचारांनां समजावून घेऊया असे आवाहन केले. तसेच श्रमिक विद्यालयातील दहावी पास व लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी पास विद्यार्थ्यांचे व पालकांचे 100% निकाल लागल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन परिवर्तन घडविले पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी संस्थेचे सचिव व प्राचार्य श्री. मधुकर थूल, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आंबेकर, प्राध्यापक अमोल गिरकर, अजय बांबाडे, नितीन वळवी, सचिन कुळये, मंगेश मांडवकर प्राध्यपिका चव्हाण, तेंडुलकर, भडेकर, तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापिका समृद्धी कुड यांनी या कार्यक्रम सूत्रसंचालन, प्रास्ताविक कल्पना मेस्त्री यांनी तर आभार व्यक्त मनीषा तेंडुलकर केले.