दापोली : दापोली तालुक्यातील एसटी डेपोमध्ये उभ्या केलेल्या बसच्या टाकीचे लॉक तोडून प्लास्टीकच्या पाईपच्या सहाय्याने पेट्रोलची चोरी झाल्याची घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याबाबतची फिर्याद सचिन वेल्हाळ (43, गिम्हवणे, गोसावीवाडी, दापोली) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.
अज्ञाताने डिझेलच्या टाकीचे लॉक तोडून पाईप टाकून डिझेल चोरले. यामध्ये दोन गाडयांतील एकूण 12 हजार 86 रुपयांचे 120 लीटर डिझेल चोरीस गेले आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.