(आरोग्य)
यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत असतो. किरकोळ बिघाड झाला तर यकृत तो सहसा दर्शवत नाही. म्हणूनच यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते. प्रौढ मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. मनुष्याच्या इंद्रियांपैकी यकृत हे एकमेव इंद्रिय असे आहे की, ज्यामध्ये हानी किंवा रोगग्रस्त झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार होतात आणि यकृत पुन्हा कार्य करू शकते.
आजकाल अनेक लोक मांसाहार करतात. तसेच हे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त देखील आहे. मांसाहार केल्याने व्यक्तीच्या शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि व्हिटॅमिनचा पुरवठा होत असतो. मात्र अति मांसाहार शरीराला घातक ठरतो. जेव्हा आपण जास्त प्रमाणात मांसाहार करता किंवा जर कोणाला जास्त मद्यपान करण्याची सवय असेल तर याचा लिवरला याचा त्रास होवू शकतो. मात्र लिवर खराब होण्यापूर्वी तुम्हाला काही संकेत मिळतात, त्याबाबत जाणून घेऊ
लिवर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे आणि तो जर खराब झाला तर प्राणघातक देखील ठरू शकतो. लिवर खराब होण्यापूर्वी आपले शरीर काही सूचना करते. यकृताच्या अनेक रोगांमध्ये कावीळ होणे, हे मुख्य लक्षण असते. जेव्हा रक्तातील बिलीरुबीन वाढते तेव्हा कावीळ उद्भवते. वाढलेल्या बिलीरुबीनमुळे त्वचा पिवळसर दिसू लागते आणि डोळ्याची बुबुळे पिवळी दिसू लागतात. आपल्या शरीराची त्वचा पिवळी पडू लागते
दुसरे लक्षण म्हणजे शौचाचा रंग फिकट होणे. जर शौचाचा रंग जर आपल्या सामान्य शौचापेक्षा फिकट होत असेल तर हे सुद्धा लिवर म्हणजे यकृत खराब होण्याचे लक्षण आहे. शिवाय जर जखम झाली आणि तिचा रक्तस्त्राव जर थांबत नसेल तरी हे लिवरच्या बिघाडामुळे होवू शकते. सोबतच जर हाताला खाज उठत असेल आणि पुढे जाऊन ही खाज पुर्ण शरीरभर पसरत जाते.
पोटावर सूज येणे – सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर आजार आहे. ज्यात पोटात एक द्रव्य तयार होतो व रक्त आणि द्रव्यात प्रोटीन आणि एल्बुमिनचा स्तर राहतो. यामुळे असे वाटते की रोगी गर्भवती आहे. जेव्हा त्वचा रंगरहित व डोळे पिवळे दिसतात तेव्हा असे आढळून येते की लिव्हरचा त्रास होणार आहे. त्वचा आणि डोळ्यांचे या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवतात की रक्तात बिलीरूबीनचा स्तर वाढला आहे
पोटात दुखणे – पोटात दु खणे, खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली उजव्या भागात दुखणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे संकेत आहे.
मूत्रात परिवर्तन- शरीरात वाहणार्या रक्तात बिलीरूबिनचा स्तर वाढल्यामुळे मूत्राचा रंग पिवळा होतो, ज्याला खराब लिव्हर किडनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो.
त्वचेत जळजळ – त्वचेवर खाज सुटणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे. कारण त्वचेत असणार्या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते. तसेच पचनाशी निगडित समस्या जसे अपचन आणि ऍसिडिटीमुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात.
भूक कमी लागणे –लिव्हर खराब झाल्याने योग्य उपचार न केल्यास भूक कमी लागते. ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत. अशा प्रकरणात जेथे रोगी फारच अशक्त होतो. लिव्हर मध्ये बिघाड असल्यास आपली भूकही मंदावणं संभव आहे. एकेकाळी पट्टीचा खाणारा माणूसही ह्या विकारामुळे भूक हरपून बसतो.
आपण जेवढे बाहेरचे खाणे टाळू तेवढच तुमचे पोट साफ व चांगले राहिल. बाहेरचे पदार्थ जरी स्वादिष्ट असले तरी ही ते पदार्थ खाल्याने तुमच्या लिवरला पुढे खूप त्रास होवू शकतो. म्हणून नेहमी घरचे ताजे जेवण करावे. याने आपले आरोग्य नेहमी चांगले राहिल जर तुमचे पोट चांगले असेल तर तुमचे स्वास्थ्य देखील चांगले राहील. निरोगी राहण्यासाठी दिवसाला पाच ते सहा लिटर पाणी आपण ग्रहण केले पाहिजे.
टीप – या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याबाबत काही लक्षणे जाणवल्यास, काही अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर वा तज्ज्ञांशी संपर्क साधावा.