( रत्नागिरी )
रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ येथे भाजून जखमी झालेल्या वृध्देचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. इंदिरा शिवराम शिंदे (83, लाजूळ, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.