( पुणे )
8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्याचे अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने अटक केली. या कारवाईने राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता सीबीआय तपासात धक्कादायक माहिती उघड होत आहे. लाचखोरीच्या प्रकरणात रामोड यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयातून सहा कोटी ६४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर सरकारी कार्यालयातून सव्वालाख रुपये जप्ते केले असून, न वापरलेला एक नवाकोरा महागडा मोबाइलही कार्यालयातून जप्त केला आहे. तसेच, मेसर्स वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अँड डिझायनर्स प्रा. लि. नावाची कंपनी त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे रामोड यांनी आणखी काही जणांकडून लाच घेतल्याचा संशय ‘सीबीआय’ने व्यक्त केला आहे. ‘रामोड हे लाचखोरच (हॅबिच्युअल ऑफेंडर) आहेत. असे या प्रकणातून दिसून येते,’ असे ‘सीबीआय’ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे.
अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याचे लाच घेण्याचे एक सूत्र ठरले होते. भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच त्याच्याकडून घेतली जात होती. म्हणजेच भूसंपादनाचे मूल्य १ कोटी वाढवले तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील, असे त्याच्याकडून सांगितले जात होते. सीबीआयने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
दरम्यान, डॉ. अनिल रामोड याला शनिवारी न्यायालयात हजर केले असून त्याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआयाने पाच दिवासांची कोठडी मागितली होती. दरम्यान सीबीआयला अनिल रामोड याच्याकडे जी सहा कोटींची रक्कम मिळाली आहे त्यात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आहेत.