(राजापूर)
राजापूर तालुक्यातील परुळे येथे तीन हजार रु. ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या ग्रामसेवक संजय बबन दळवी (वय ४१) याची न्यायालयाने पंधरा हजार रु. च्या जामिनावर सुटका केली आहे. आरोपीच्यावतीने ॲड. निनाद शिंदे यांनी काम पाहिले.
दि. २७ जुलै रोजी परुळे ग्रामसेवक संजय बबन दळवी याला पाचल येथे तक्रारदार यांच्याकडून घराचा असेसमेंट उतारा तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर करून देण्यासाठी तीन हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने रत्नागिरीतील न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी त्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने संजय दळवी याची पंधरा हजार रु.च्या जामिनावर सुटका केली. संशयित आरोपीच्यावतीने ॲड. निनाद शिंदे यांनी काम पाहिले.