(महाड / चंद्रकांत कोकणे)
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना लाकडांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. यामध्ये सहा जणांसह ट्रॅक्टर आणि जेसीबी वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साहू आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना दोन ट्रॅक्टर मध्ये आंब्याचे भले मोठे लाकूड आणि साग वाहतूक करताना आढळली. याबाबत चौकशी केली असता वाहतूक करणाऱ्या लोकांकडे कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे आढळली नाहीत. यामुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरता वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत वनाधिकारी राकेश साहू यांनी माहिती देताना पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावाजवळ ही विना परवाना लाकूड वाहतूक आढळून आल्याचे सांगितले. यामध्ये नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, एक जे.सी.बी., एक स्कूटर, तसेच आंब्याची दोन लाकडे, साग असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये सूर्यकांत सुरेश तांबे ३८ मांडवे, दिनेश रामदास तांबे, वय ४५ कोरेगाव, तालुका – खेड, अनिल धर्मा चव्हाण, ट्रॅक्टर चालक सुकिवली खेड, संदीप श्रीकांत पाटणे, ट्रॅक्टर चालक मालक ४२ भरणे नाका, रजनिष मनिराम निसाद, २४ अकबरपुर यू पी, जे सी बी चालक, शेखर यशवंत शिंदे ३२ कोरेगाव खेड, कपिल देव नीसाद यू पी सद्या मुक्काम पोलादपूर जेसीबी हेल्पर, अमेष जयराम तांबट ३० कोरेगाव खेड कामगार, बबन लक्ष्मण तांबे ४० मांडवे यांचा समावेश आहे.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना विरोधात भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ कलम ४१, ४२ अन्वये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती राकेश साहू यांनी दिली. या पथकामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी राकेश साहू, वनपाल संजय चव्हाण, संदीप परदेशी वनरक्षक अतिरिक्त कार्यभार पोलादपूर, वन रक्षक कोतवाल पी. डी.जाधव वनरक्षक, यांचा समावेश होता.