(लांजा)
भारतीय बौद्ध महासभा लांजा शाखेच्यावतीने शनिवारी ( २६ नोव्हेंबर) संविधान गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला मेणबत्ती प्रज्वलित करून व तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संविधानाने सर्व भारतीयांना अभिमानाने जगण्याची हमी दिलेली आहे. जरी घटनादुरूस्तीचा कायदा असला तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्यात बदल करण्याची घटनादुरुस्ती संसदेला करता येत नाही. हा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आहे, असे मत डॉ. मीनल कुष्टे यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी संविधानाची माहिती देत भारतीय बौद्ध महासभेविषयी विस्तृत माहिती दिली.
दरम्यान कार्यक्रमात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या वंचित बहुजन पक्षाच्या उमेदवारांचा देखील सत्कार करण्यात आला व बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद जाधव, ता.सरचिटणीस ॲड. डॉ प्रभाकर शिंगणे, कोषाध्यक्ष मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष दिनेश कांबळे तसेच महिला विभाग प्रमुख प्रज्ञा कांबळेसह संविधानवादी आदी उपस्थित होते.