(रत्नागिरी /प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा १० मे रोजी जन्म दिन असतो. हा दिवस महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभरात ‘स्वाभिमानी दीन’ म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक साजरा करत असतात. दरवर्षप्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात स्वाभिमानी दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिन हा शाळेतील मुलांना पुस्तके वाटप करून साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त लांजातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे वाटप केले. स्वाभिमानी दिनानिमित्त लांजातील वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल जावडे या शाळेतील विद्यार्थ्याच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके शाळेचे मुख्याध्यापक संदेश कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या वेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष डॉ. मीनलताई कुष्ठे , वंचित बहुजन आघाडीचे लांजा तालुकाअध्यक्ष शशिकांत कदम, तालुका निरीक्षक/संपर्क प्रमुख जगन्नाथ कांबळे, महिला उपाध्यक्ष रुपालीताई पवार, भांबेड पंचायत समिती गण उपाध्यक्ष आत्माराम कांबळे आदी उपस्थित होते.