लांजा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देवधे येथील शासकीय कोविड सेंटरला पिण्याचे पाणी गरम करण्याची उपकरणे भेट देण्यात आली. लांजा देवधे येथील शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची आवशकता असल्याची बाब निदर्शनात आल्यानंतर लांजा- राजापूर मतदार संघाचे नेते तसेच राष्ट्वादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली लांजा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज पाणी गरम करण्याची उपकरणे लांजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारूती कोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी लांजा-राजापूर युवक विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेश झोरे, लांजा युवक तालुका अध्यक्ष बाबा धावणे, माजी युवक तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा सदस्य सुजित भुर्के, सामाजिक न्याय सेलचे दाजी गडहिरे उपस्थित होते.