( लांजा )
तालुक्यातील झापडे आणि विलवडे या दोन गावांमध्ये काजू आणि आंबा बागांना गुरुवारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. आंबा, काजू , रतांबीची सुमारे ८०० झाडे जळून खाक झाली. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
लांजा तालुक्यातील झापडे ब्राह्मणवाडी येथील आनंद अशोक राजाध्यक्ष ( वय ४८ ) यांच्या घराशेजारील असलेल्या काजूच्या बागेला १२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्याने आग लागली. या आगीत आनंद राज्याध्यक्ष यांची साडेतीनशे काजूची कलमे जळाली. याबाबत त्यांनी १९ जानेवारी रोजी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलिस नासिर नवलेकर करत आहेत.
विलवडे येथे १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीत पांडुरंग नारायण खामकर यांच्या काजू बागेतील ४०० काजू झाडे, १०० आंबा, कोकम दहा, बांबू १० ही झाडे जळाली. त्यांनी गुरुवारी १९ जानेवारी रोजी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.