(लांजा / प्रतिनिधी)
लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, लांजा या संस्थेची सभासद नोंदणी उद्दिष्टय पूर्तिकडे वाटचाल होत असल्याने संस्थेच्यावतीने सभासदांचे आभार व स्वागत करण्यात आले. संस्थेच्या सभागृहात नुकताच छोटेखानी कार्यक्रम पार पडला. कोकणातील काजू उत्पादनावर प्रक्रिया करून सहकार, उद्योग क्षेत्र निर्माण करून तालुक्यातील रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट हाती घेऊन पुढचे पाऊल टाकणाऱ्या लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड लांजा तालुका या संस्थेने अल्पावधीत नावलौकिकता प्राप्त केली आहे.
काजू शेती, प्रक्रिया व त्या आधारीत काजू उद्योगाला अधिक बळकटी देण्यासाठी अधिका अधिक सभासद जोडणीवर भर देण्याचा मानस केला आहे. अल्पावधीत संस्थेशी एकूण ७५० सभासद जोडले गेले आहेत. उद्दीष्टपूर्तीकडे वाटचाल करत असल्याने संस्थेने समाधान व्यक्त केले आहे. कोकणामध्ये सहकारी तत्वावर प्रभावी संघटन तयार करणे, नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करणे,कोकणातील विविध पिकांचे उत्पादन घेणे, खरेदी- विक्री केंद्र उभारणे, कंपनीच्या नावाने ब्रॅंडिंग करणे, व वस्तू नवीन तंत्रज्ञान आयात करणे यावर लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने भर दिला आहे.
लांजा तालुक्यात कंपनीशी सभासदांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने काजू शेतकरी व सभासद संख्या वाढत आहे. कंपनीशी जोडलेल्या सर्व सभासदांचे लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चेअरमन श्री.आनंद कांबळे, संचालक श्री.गणेश खानविलकर, श्री.विजय भगते, मुंबई टीम आणि सर्व संस्था पदाधिकारी या सर्वांनी आभार मानून स्वागत केले.