(लांजा / प्रतिनिधी)
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १९ नोव्हेंबर रोजी असलेल्या जयंती दिनाचे निमित्ताने रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट, लांजा आणि लोकमान्य वाचनालय लांजे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनचरित्राला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
गट क्र.१ प्राथमिक गट इ.५ ते ७ साठी झाशीची राणी लक्ष्मीबाई एक महान वीरांगना आणि राणी लक्ष्मीबाई एक प्रेरणा स्त्रोत हे विषय ठेवण्यात आले आहेत. गट क्र.२ माध्यमिक गट ३.८ ते १० करिता राणी लक्ष्मीबाई यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि राणी लक्ष्मीबाई यांचा अनिष्ट रुढीविरोधातील लढा हे विषय आहेत. निबंध पाठविण्याची अंतिम मुदत १६ नोव्हेंबर २०२२ अशी आहे. निबंध कार्यवाह, लोकमान्य वाचनालय, लांजे येथे पोहोच करावेत. तर वक्तृत्व स्पर्धा १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दु.२.३० वा. लोकमान्य वाचनालय, लांजे येथे संपन्न होईल.
वक्तृत्व स्पर्धेची नावनोंदणी व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी महेंद्र साळवी (९४२२५५९९८४) किंवा उमेश केसरकर ( ९४२३२९७८३०) यांचेशी संपर्क साधावा. विजेत्यांना प्रथम रोख ५०१/- पुस्तक भेट व प्रशस्तीपत्र, द्वितीय रोख ३०१/-, पुस्तक भेट व प्रशस्तीपत्र आणि तृतीय रोख २०१/-, पुस्तक भेट व प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.