(लांजा / वार्ताहर)
लांजा तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा ही अत्यंत महत्वाची शाखा असून दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. पुरवठा शाखेचा भार पुरवठा अधिकारी शितोळे यांच्यावर आहे. नागरिकांची समस्या आणि कामे व्यवस्थित हाताळली जात आहेत, असे लोकांकडून बोलले जात आहे. महसूल सप्ताह निमित्ताने भटके विमुक्त आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा शाखेला भेट देत शितोळे यांचे अभिनंदन केले. ‘शासन आपल्या दारी’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचा फायदा कसा नागरिकांना होत आहे याबाबत शितोळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने दिवाळी, आंबेडकर जयंती, या निमित्ताने दिलेला आनंदाचा शिधा हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावात वाढीवस्तीमध्ये पोहचण्यात आला आणि लोकांनी त्याचे कौतुकही केले अनेक गोरगरीब लोकांना याचा लाभ दिला.
शितोळे हे एक प्रामाणिक आणि कर्व्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख आहे. लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता नियमात बसतील अशी सर्व कामे त्यांच्याकडून केली जातात आणि समजावून सांगितले जाते. त्यामुळे अशी व्यक्ती लांजा पुरवठा विभागात अधिकारी आहेत याचे कौतुक आहे. आणि त्यामुळेच लांजा पुरवठा विभागाचे काम हे कौतुकास्पद आहे. असे भाजपा भ. वि. जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी म्हटले आहे.