( लांजा / प्रतिनिधी )
लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ. पूर्वा मुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. लांजा नगरपंचायतीत शिवसेनेचे १४, भाजपचे ३ नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव यांनी सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपताच आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्याकडे सुपूर्द केला होता. गुरुवारी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न झाली. सौ. पूर्वा मुळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून नगर पंचायतीच्या प्रशांत भोसले यांनी काम पाहिले. शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष मनोहर चाईत, नगरसेवक आदींनी नूतन उपनगराध्यक्ष सौ. पूर्वा मुळे यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.