( प्रतिनिधी / प्रतिनिधी )
लांजा तालुक्यातील आसगे येथे एक अनोळखी चारचाकी मारुती कार गेली महिनाभरापासून बेवारस स्थितीत उभी आहे. या कारवरून लांजा तालुक्यात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही कार उभी ठेवण्यामागे कारण काय…?
आसगे येथील कोळझरीचा पऱ्या येथे लांजा-दाभोळे-साखरपा मार्गालगत निर्जनस्थळी ही कार उभी आहे. लाल रंगाची अल्टो कार (क्रमांक जी ए-०२, जे-६२६८) असा या गाडीचा नंबर आहे. काही दिवसांपूर्वी ही गाडी सुस्थितीत होती. मात्र त्यानंतर कुणीतरी अज्ञाताने कारच्या मागील काचा फोडल्या आहेत. या गाडीचा मालक कोण आहे? गोवा पासिंगची ही गाडी या ठिकाणी कुणी आणून ठेवली आहे. महिनाभरात मालकाला गाडीची गरजच भासली नाही का? की आणखी वेगळं कारण या मागे आहे. असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.