(लांजा/प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील अंजणारी घाटात अराम बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात बस चालक जखमी झाला असून अन्य प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
सध्या मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरण काम सुरू असून महामार्गाच्या बाजूला उत्खनन करून ठेवलेल्या दगडांवर बस जाऊन धडकली. जोरदार धडक बसल्याने बस रस्त्यावर पलटली झाली. चार तास महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे.