( लांजा / प्रतिनिधी )
मुंबई गोवा महामार्गावरील आंजणारी पुलावरून गॅसने भरलेला टँकर थेट नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. या टँकर चे दोन तुकडे झाले आहेत. चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रमोद जाधव ( रा. उस्मानाबाद ) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
प्रमोद जाधव हा जयगडहून गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी आंजणारी उतारावर त्याचा ताबा सुटल्याने टँकर नदीत कोसळला. आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.