( लांजा / प्रतिनिधी )
तालुक्यातील कोर्ले ते भांबेड असा दुचाकीवरुन प्रवास करताना दुचाकी स्लीप होउन अपघात झाला. या अपघात तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकिशोर हरिश्चंद्र साळुंके (40, कोर्ले, फौजदारवाडी, लांजा) असे मृत्यू झालेल्या व गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर हा ताब्यातील दुचाकीवरुन कोर्ले ते भांबेड असा जात होता. तो मुचकुंदी नदीवरील पुलावर आला असता गाडी भरधाव वेगाने चालवली. यामध्ये गाडी स्लीप होवून मोठा अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद पोलीस हवालदार भालचंद्र रेवणे यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अपघातातील दुचाकीस्वारावर भादविकलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.