कोरोना संक्रमण रोखायचे असेल तर आजच्या घडीला त्यावरील लस घेणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. लसींचा तुटवडा जाणवत असला तरी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्यास शासन प्रयत्नशील आहे. अशा वेळी अनेकांच्या मदतीला नेहमीच धाऊन जाणारे म्हणून ओळख असणारे सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी “लसीकरणासाठी मोफत रिक्षा” हा अभिनव उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
केवळ निवडणुकीच्या वेळी मतदारांना रिक्षा पाठवणारे आता गेले कुठे ? असा उपरोधिक सवाल देखील हा उपक्रम बघून सोशल मिडीयावर विचारला जात आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी अनेक जेष्ठ नागरिक, महिला यांच्याकडे वाहन नसते, अशांसाठी हि मोफत रिक्षाची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी केली आहे. साळवी स्टॉप ते शिवाजी नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हि सेवा उपलब्ध असून कोकणनगर येथील लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी हि मोफत रिक्षाची सोय करण्यात आली आहे. या सेवेसाठी आदल्या दिवशी सौरभ मलुष्टे ७९७२१३०८५३, योगेश वीरकर ९५२७६२३६९६, सुनील बेंडखळे ९०२८४७८३४४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.