( संगमेश्वर / प्रतिनिधी )
लग्न जमत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणाने वेडाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द महाडिकवाडी येथे घडली. प्रवीण रघुनाथ भोजने (३२, कुंभारखाणी खुर्द, भोजनेवाडी, संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ अजित भोजने याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण भोजने याचे लग्न ठरत नसल्याने तो निराश होता. त्याच्या मनावर परिणाम झाला होता. वेडाच्या भरात वायफळ बडबड करत असे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास काजूच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्याला माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबाबत भाऊ अजित भोजने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.