भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न जुळवताना मुलीकडील व्यक्ती मुलाला काम व शिक्षणानंतर सर्वात महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नवरा मुलाला दारू व सिगरेटचे व्यसन तर नाही ना? तर व्यसनाच्या प्रश्नाला सर्वांचेच उत्तर नकारार्थी असते. असे असेल तरच लग्नाची बोलणी पुढे जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये लग्नात सासू-सासरेच नवरदेवाला सिगरेट ओढायला देत असल्याचा व्हिडिओ व्ह्ययरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चक्क सासू-सासऱ्याद्वारे नवऱ्या मुलाला सिगारेट ओढायला दिल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला.
https://www.instagram.com/reel/CoWXyUPDIOr/?utm_source=ig_embed&ig_rid=b8340180-cb56-4a9f-bc55-92ae3b2a7d39
या व्हिडिओमध्ये, पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान करून नवरदेव लग्न मंडपात बसला आहे आणि त्याच्या आजूबाजूला अनेक महिला उभ्या आहेत. दरम्यान एक महिला आपल्या हातात पकडलेली सिगारेट नवरदेवाच्या तोंडात देते. त्याचवेळी बाजुला उभा पुरुष माचिसने ती सिगरेट पेटवतो. नवरदेवाला सिगारेट ओढायला देणारे दुसरे कोणी नसून नवरी मुलीचे आईवडील आहेत.
गुजरात राज्यात काही ठिकाणी विवाहावेळी सासू-सासऱ्याकडून नवरदेवाला सिगरेट ओढायला देण्याचा रिवाज असल्याचे समजते. धूम्रपान आरोग्यास हानिकारक, निषिद्ध आहे,मात्र त्यानंतरही या गावाने आपली परंपरा, रिवाज कायम ठेवला आहे.