(रत्नागिरी)
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तिघांना न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. ही घटना १९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा व दिवा मुंबई, साठरेबांबर येथे घडली होती.
या प्रकरणातील यज्ञेश अनंत धनावडे, प्रतीक संतोष ताम्हणकर, हृषीकेश रवींद्र शिंदे या तिंघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांनी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. या प्रकरणी पीडितेने जयगड पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.