(रत्नागिरी)
तालुक्यातील अल्पवयीन मुलीला तीन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी जयगड पोलिसात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. यज्ञेश अनंत धनावडे, प्रतीक संतोष ताम्हणकर, रूतिकेश रवींद्र शिंदे अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा व दिवा मुंबई, साठरेबांबर येथे घडली आहे. संशयितांनी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिकसंबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी फिर्यादी यांनी जयगड पोलिसात तक्रार दिली.
तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(जे) ३७६ (२) (एन) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ९ (एल) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. संशयितांनी घरी सोडण्याचा बहाणा करून शारीरिक संबंध ठेवल्याचे गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. तर, २०१८ ला त्याच्या घराच्या मागे व पीडिता आंघोळ करत असताना तिचा मोबाईलवर व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.