(रत्नागिरी)
रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना “बेस्ट चेअरमन परफॉरमन्स् अॅवार्ड २०२२” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
इंटेलिक्चुअल पिपल्स् फाऊंडेशन ही संस्था दिल्ली येथे कार्यरत आहे. ही संस्था भारताची अर्थव्यवस्था, देवाण-घेवाण, कल्याणकारी योजनांच्या माहितींचे संकलन करून, आरोग्य, शिक्षण, वाणिज्य आणि उद्योग, सामाजिक सेवा, बँकींग सेवा आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या योगदान आणि कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानीत करून त्यांच्यासाठी व्यासपिठ निर्माण करते.
या संस्थेने बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना दिल्ली येथे पद्मश्री डॉ.जितेंद्र सिंग शंटी यांचे हस्ते ‘बेस्ट चेअरमन परफॉरमन्स अॅवार्ड २०२२’ पुरस्काराने सन्मानीत केले. सदर पुरस्कार वितरण सोहळा दिल्ली येथे दि. ३१ जुलै २०२३ रोजी हरिष रावत, माजी मुख्यमंत्री उत्तराखंड, श्री. अब्दुल खालीद, राज्यसभा सदस्य, डॉ. बी. व्ही. सोनी, राजदूत, श्री. हरिपाल रावत, जॉईंट सेक्रेटरी – ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, आसाम यांचे उपस्थितीत आयोजित करणेत आला होता.