(क्रीडा)
मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात दिल्लीचा पाच विकेटने पराभव करत यंदाच्या आयपीएलचा शेवट गोड केलाय. दिल्लीने दिलेले 160 धावांचे आव्हान मुंबईने पाच गडी राखून पूर्ण केले. या पराभवामुळे दिल्लीचे प्लेऑफ मध्ये जाण्याचं स्वप्न भंगल आहे. दिल्लीच्या हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी धुवांधार फटकेबाजी करत मुंबईच्या मधल्या फळीने घशातून काढून घेतला. मुंबईच्या विजयामुळे आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचली आहे. गुजरात, राजस्थान, लखनौनंतर आता आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश झाला आहे.
आयपीएल दिग्गज संघ आयपीएल मधून बाहेर गेले आहेत. नवीन संघांनी दमदार मजल मारली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स, केएल राहुलचा लखनौ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केलाय. त्याशिवाय आरसीबीने आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. क्वालीफायर 1 आणि एलिमिनेटर कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियम खेळवण्यात येणार आहेत. तर क्लालीफायर 2 आणि फायनलचे सामने अहमदाबाद स्टेडिअमवर होणार आहेत.
प्लेऑफ सामना
कोलकाताच्या ईडन गार्डनवर क्वालीफायर 1 सामना होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल दोन संघामध्ये 24 मे रोजी हा सामना रंगणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे. तर पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळणार आहे. पराभूत झालेला संघ क्वालीफायर 2 मध्ये खेळणार आहे. एलिमिनेटरचा विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहोचेल.
दूसरा प्लेऑफ सामना
एलिमिनेटरचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुलचा लखनौ संघ आहे. तर चौथ्या क्रमांकावर आता आरसीबी आहे. त्यामुळे 25 मे रोजी आरसीबी आणि लखनौ यांच्यात सामना होणार आहे.
प्लेऑफचं वेळापत्रक
क्वालिफायर 1 : (गुजरात vs राजस्थान) 24 मे – कोलकाता
एलिमिनेटर : लखनौ vs आरसीबी, 25 मे – कोलकाता
क्वालिफायर 2 – 27 मे – अहमदाबाद
फायनल: 29 मे – अहमदाबाद