( खेड /प्रतिनिधी )
रोलर अथलेटिक्स असोसिएशन तर्फे स्केटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून तब्बल 90 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत खेड तालुक्यांमध्ये द्वितीय तर चिपळूण तालुक्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
या रोलर ॲथलेटिक्स सहा वर्षाखालील स्केटिंग स्पर्धेत सहा वर्षाखालील वयोगटात खेडच्या रोटरी स्कूल येथील कैवल्य समीर पाटणे याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
छोट्या कैवल्यने आपल्या बोबड्या शब्दात प्रतिक्रिया दिली असून, “माझं नाव कैवल्य समीर पाटणे. माझे वय पाच वर्षे आहे. रत्नागिरीत जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा झाल्या. या स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यामधून 90 मुलं आली होती. यात अंडर सहा वर्ष या वयोगटात माझा पहिला नंबर आला. त्यात मला गोल्ड मेडल मिळालं. याचा मला आनंद आहे. पुढे मला भविष्यात स्केटिंगमध्ये आणखी स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे.” असे म्हटले आहे.