(जाकादेवी / संतोष पवार)
रोटरॅक्ट क्लब रत्नागिरी मिडटाऊन या तरुण व्यवसायिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या क्लबची स्थापना करण्यात आली असून या रत्नागिरी रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी आर्य आंबुलकर तर सचिवपदी राजस सुर्वे यांची निवड करण्यात आली. रोटरॅक्ट क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन या तरुण व्यवसायिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या क्लबची स्थापना करण्यात आल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. रोटरॅक्ट क्लबचे नेतृत्व करण्यासाठी चार्टर प्रेसिडेंट रोटरॅक्ट आर्य विनय आंबुलकर यांची अध्यक्षपदी सचिव पदी राजस सुर्वे तर खजिनदारपदी झलक जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरची नियुक्ती प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नामनिर्देशित अरूण भंडारे, झोनल कोऑर्डिनेटर कोऑर्डिनेटर समीर इंदुलकर, असिस्टंट गव्हर्नर प्रशांत देवळेकर उपस्थित होते.
रोटरॅक्ट क्लबचे उद्दिष्ट तरुण व्यावसायिक व विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांचे निराकरण करणाऱ्या सामुदायिक सेवा प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभाग करून घेणे असे आहे.पुढील एक वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहे.
यावेळी रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊनच्या पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. सन २०२३ ते २०२४ या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून बिपीनचंद्र गांधी यांची नियुक्ती करण्यात आली, सचिवपदी डॉ. स्वप्ना खरे तर खजिनदार म्हणून जयेश दिवाणी यांची अधिकृत नेमणूक करण्यात आली आहे .
क्लबच्या अध्यक्षा ॲड.शाल्मली अंबुलकर यांनी नवनियुक्त अध्यक्ष बिपीनचंद्र गांधी यांच्याकडे क्लबच्या प्रतिकात्मक जबाबदाऱ्या सुपूर्द केल्या. क्लब पुन्हा एकदा नव्याने आणि जोमाने यशाच्या शिखरावर नेण्याच्या संघाच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेती महाराष्ट्र खो-खो संघातील खेळाडू अपेक्षा सुतार, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वल्लभ विभावरी वणजू उर्फ भैय्या वणजू यांचा प्रेरणादायी आणि उत्साहात सत्कार करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लबच्या परिवारात नवीन सदस्य म्हणून श्रेया इंदुलकर, सिताराम सावंत, संतोष राय हे सामील झाले. पदग्रहण सोहळ्याप्रसंगी रोटरी क्लबच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच ज्येष्ठांचे आवर्जून मार्गदर्शन घेऊन युवा वर्गाला सामील करून घेऊन सामाजिक कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित चार्टर प्रेसिडेंट आर्य आंबुलकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले .अरुण भंडारे यांनी इन्स्टॉलेशन अधिकारी या नात्याने प्रेरणादायी मार्गदर्शन करताना रोटरीच्या सेवा ,फेलोशिप ,विविधता, सचोटी आणि नेतृत्व व मूलभूत मूल्यांवर भर देण्यावर मार्गदर्शन केले.रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन क्लबच्या सामाजिक व राष्ट्रीय नेतृत्वाचा हा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी नवनियुक्त टीमला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला रोटरी ग्रुपचे रत्नागिरीतले सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.