(आरोग्य)
जवळपास सर्वच भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा वापर केला जातो. धने हे भारतामधील लोकप्रीय मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे. धन्यामुळे केवळ पदार्थच स्वादिष्ट बनत नाहीत. तर धन्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. मानवी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज हिरवे धणे किंवा कोथिंबीर खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळेच तर आहार तज्ज्ञांकडून धन्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. धन्याचे पाणी बनवण्यासाठी रात्री एक कप पाण्यामध्ये एक चमचा धने भिजत घाला. सकाळी या पाण्याला गाळून घ्या. त्यानंतर तुम्ही हे पाणी पेऊ शकता. धन्यांच्या पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियमचा साठा असतो. तसेच धन्यामधील इतर पोषक तत्वे देखील तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवता. म्हणूनच अनेक भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा वापर केला जातो. आज आपन धन्याचे विविध उपयोग जाणून घेणार आहोत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
धन्याच्या पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅगन्शियमचा साठा असतो. हे पोषक तत्वे तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात. धन्याचे पाणी रोज सकाळी पिणे आरोग्यदायी असते. धन्याचे पाणी पिल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच धन्याचे पाणी पिल्यास तुमचे शरीर देखील तंरुस्त राहाते. कमकुवत रोगप्रतिकरशक्ती वाढवण्यासाठी कोथिंबीरच्या बियाचे पाणी पिणे गरजेचे आहे. कोथिंबीरच्या बियात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात. परिणामी अनेक आजारांशी लढण्यास सहकार्य मिळते.
थायरॉइड व वजन कमी करते
थायरॉइड आणि वजन कमी यांसारख्या समस्यांवर कोथिंबीर रामबाण उपाय म्हणून काम करते. थायरॉईडची कमतरता किंवा जास्ती दोन्हीमध्ये हे फायदेशीर आहे. कोथिंबीरमध्ये आढळणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे थायरॉईड संप्रेरकांचे नियमन करण्यास मदत करतात. धने सेवन करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे दररोज सकाळी रिकाम्यापोटी धन्याचे पाणी पिणे. धन्याच्या पाण्यामध्ये असे देखील काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची पचन शक्ती वाढते. सोबतच तुमच्या शरीरातील मेटाबॉल्जिम देखील वाढते. यामुळे तुमचे वजन अवघ्या काही दिवसांत कमी होऊ शकते. धन्याच्या पाण्यात चयापचय प्रक्रिया गतिमान करणारे घटक असतात. त्यामुळे शरीरात साठलेली चरबी कमी होऊ लागते आणि वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
तोंड येण्याची समस्या
तुमच्या शरीरात अधिक उष्णता असेल, आणि त्यामुळे जर तुम्हाला सातत्याने तोंडात फोड येत असतील, तर त्यावर देखील धने रामबाण इलाज आहे. धन्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरामधील उष्णता कमी होते. परिणामी उष्णतेपासून निर्माण होणाऱ्या समस्येतून तुम्हाला सुटका मिळते.
कॉलेस्ट्रोलपासून सुटका
विविध पदार्थ्यांच्या सेवनामुळे शरीरात कॉलेस्ट्रोल वाढू शकते. कॉलेस्ट्रोलमुळे तुम्हाला विविध आजार होऊ शकतात. तुम्ही रोज रात्री धने भिजत घालून, सकाळी ते पाणी पिल्यास तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
केसांसाठी उपयोगी
कोथिंबीर/धने व्हिटॅमिन के, सी आणि ए ने भरपूर असते. धन्याच्या पाण्याचे सेवन केल्याने केस मजबूत आणि जलद वाढण्यास मदत होते. रोज धन्याचे पाणी सेवन केल्याने केस गळणे आणि तुटणे कमी होते. याशिवाय तुम्ही कोथिंबीर तेल आणि हेअरमास्क पद्धत वापरू शकता.
पोटाचे विकार
धन्याचे पाणी पचनाच्या समस्या दूर करण्याचे काम करते. दररोज धन्याचे पाणी सेवन केल्याने शरीरातील पाचक अग्नी नियंत्रित राहते, ज्यामुळे पोटातील ऍसिडिटीची पातळी वाढू नये. पोटदुखी, जळजळ आणि गॅस यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. ज्या महिलांना मासिक पाळीची समस्या आहे, त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याच्या पाणी सेवन करावे. कारण यामुळे मासिक पाळीच्या समस्यांपासून सुटका मिळते. धन्याच्या पाण्यामधील अँटिस्पास्मोडिक प्रॉपर्टीज पीरियड्सच्या वेदना कमी करते.
मुरुमे कमी करते
धने/ कोथिंबिरीमध्ये भरपूर लोह असते. त्यात अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. सकाळी धने/ कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम राहते.
मधुमेहावर नियंत्रण ठेवते
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही धन्याचे पाणी पिऊ शकता. धण्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण याच्या सेवनाने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेव्हल बॅलन्स राहते. यामुळे डायबिटीसची शक्यता कमी होते. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी धणे हे सर्वात विश्वसनीय पारंपारिक उपायांपैकी एक आहे. कोथिंबीरच्या बियांच्या अर्कामध्ये संयुगे असतात,जे रक्तप्रवाहात सोडल्यास अँटी-हायपरग्लाइसेमिक, इन्सुलिन डिस्चार्जिंग आणि इन्सुलिन सारखी क्रिया घडते ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी राखण्यात मदत होते.
हार्ट डिसिज टाळते
धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कमी करते. हे नियमित प्यायल्याने हार्ट डिसिजचा धोका टाळता येतो.
कोणी टाळावे धन्याचे पाणी?
कोथिंबिरीच्या बियांचे सहसा कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, परंतु बियामुळे एलर्जी होऊ शकते. यामुळे लालसरपणा आणि खाज सुटू शकते. तथापि, गर्भवती महिलांनी मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीचे सेवन करू नये.
धन्याचे पाणी कसे बनवायचे
धन्याचेचे पाणी बनवणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त एक चमचे धने घ्या आणि एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी पाणी गाळून प्यावे. भिजवलेल्या बिया फेकून देऊ नका कारण तुम्ही ते शिजवण्यासाठी वापरू शकता.