धार्मिक मान्यतेनुसार कलियुगात हनुमान हे सर्वात लवकर इच्छा पूर्ण करणारे देवता मानले गेले आहेत. याच कारणामुळे हनुमान चालीसा अत्यंत प्रभावी मानली जाते. शक्ती आणि भक्तीचं रूप असलेल्या श्रीरामभक्त हनुमानाची उपासना नेहमी केली जाते. बलोपसना करणाऱ्या व्यक्तींचं श्री हनुमान हे आराध्य दैवत आहे. जीवनात सुख-शांती, यशप्राप्तीसाठीदेखील हनुमानाची आराधना केली जाते. हनुमान चालीसामधील प्रत्येक दोहा चमत्कारी आहे. परंतु काही चौपाईचा प्रभाव लवकर दिसून येतो. आज तुम्हाला यामधील एक अशी चौपाई सांगत आहोत, ज्यामुळे कमजोरी दूर होऊन शरीर व मन बलवान बनते…
जय हनुमान ज्ञान गुन सागरजय कपीस तिहुँ लोक उजागर।रामदूत अतुलित बलधामा।अंजनिपुत्र पवनसुत नामा।।
या चौपाईचे महत्त्व…
जो व्यक्ती या चौपाईचा जप करतो त्याला शारीरिक कमजोरीतून मुक्ती मिळते. या चौपाईचा अर्थ असा आहे की, हनुमान श्रीरामाचे दूत असून अतुल्य बाळाचे धाम आहेत. म्हणजेच हनुमान परमशक्तीशाली आहेत. याच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे याना अंजनीचा पुत्र म्हटले जाते. शास्त्रानुसार हनुमान पवन देवाचे पुत्र मानले जातात, यामुळे याना पवनसुत असेही म्हणतात