( खेड / प्रतिनिधी )
खेड येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत दारुच्या नशेत उभ्या असलेल्या तरुणाला उलटी झाल्याने अचानक मृत्यू झाल्याची घटना 12 मार्च रोजी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. सिध्दांत संजय कांबळे (30, वरळी, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दांत हा मुंबई येथे जाण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा होता. त्याच्यासोबत त्याचे काकाही उपस्थित होते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिध्दांत हा दारुच्या नशेत होता. या नशेतच त्याला उलटी झाली आणि त्याची हालचाल मंदावली. त्याला 108 अॅम्ब्युलन्सने खेड कळंबणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून सिध्दांत याला मयत घोषित केेले. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.