(रत्नागिरी)
रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञात चोराने प्रवाशाची सॅकबॅग लांबवून तब्बल ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना गुरुवार, २० जुलै रोजी रात्री ११ ते १२ वा. कालावधीत रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली आहे.
तक्रारीनुसार, प्रवासी गुरुवारी कोच्युवेली एलटीटी एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी आपली सॅकबॅग सीटवर ठेवली होती. ती अज्ञात चोराने चोरून नेली. त्या बॅगमध्ये सोनी कंपनीचा ४० हजार रुपयांचा लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा ५ हजारांचा टॅब आणि रोख ७ हजार रुपये असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.