(खेड / वार्ताहर)
खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची पैशाची बॅग लांबवल्याची घटना घडली आहे. ओखा-एर्नाकुलम एक्स्पेसमधून प्रवास करत असताना विजयालक्ष्मी शेट्टी (बंगलोर-कर्नाटक) यांची बॅग अज्ञाताने लांबवली. याबाबत त्यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयालक्ष्मी या एक्स्पेसमधून पवास करत असताना खेड येथे एक्स्प्रेस थांबली असता अज्ञाताने बॅग लांबवली.