( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरीत खळबळ उडवून देणारी घटना शनिवार 12 नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिस स्थानकापाशी आणलेला चोरटा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. दत्तात्रय गोडसे (सोलापूर) असे फरार झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. मात्र तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर पनवेल येथे चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
सविस्तर वृत्त असे की, गोडसे याला रेल्वे पोलिसांनी पकडुन शहर पोलिस स्थानकात घेऊन येत होते. गोडसे हा सराईत गुन्हेगार आहे. रेल्वे मध्ये तो स्वतः च तिकीट काढून प्रवाशांच्या सामनावर लक्ष ठेवून असायचा. त्यानंतर प्रवाशी झोपले किंवा उतरताना संधी साधून प्रवाशांचे मोबाईल, दागिने लांबवायचा. खेड मध्ये काही दिवसांपूर्वी लाखांची चोरी झाली होती. त्यात याचा हात असल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी सोलापूर येथून शनिवार 12 नोव्हेंबर रोजी पहाटे ताब्यात घेतले होते. त्याचे हात दोरीने बांधून रेल्वे पोलीसानी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात एका खोलीत ठेवले होते. इतर सोपस्कार पूर्ण करण्यात येत होते. मात्र गोडसे याने लघुशंका झाल्याचे सांगितले. रेल्वे पोलीस त्याला बाथरूमला घेऊन जात होते. त्यावेळी त्याने पोलिसांच्या हाताला जोरदार हिसका देऊन बांधावरून उडी मारून फरार झाला होता. पोलिस शनिवार पासून त्याचा कसून तपास करत होते. पोलिसांची झोप उडाली होती. सर्वत्र बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पथके तयार करून शोध सुरू होता. पनवेल येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन लपून बसलेल्या गोडसेला अखेर ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रत्नागिरीत आणण्यात आले. उद्या त्याल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या तपास अनेक चोऱ्यांच्या उलगडा होणार आहे. दोरिसहित पळून गेल्यानंतर ती दोरी त्याने कुठे काढली. आणि तो तिथपर्यंत कसा पोचला. त्याला कोणी मदत केली का? याचा उलगडा उद्याचं होईल.