(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तुतारी एक्स्प्रेसने खेड ते रत्नागिरी असा प्रवास करणारा तरुण तोल जाऊन डब्यातून खाली पडल्याने ठार झाल्याची घटना तालुक्यातील आगवे येथील रेल्वे बोगदा परिसरात घडली. याप्रकरणी सावर्डे पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल राजेंद्र इंगवले (३६, भरणेनाका, खेड) असे त्यांचे नाव आहे.
यातील खबर देणार यांचा अनिल हा आत्तेभाऊ आहे. ते दोघे हे तुतारी एक्स्प्रेसने खेड ते रत्नागिरी असा प्रवास करीत होते. अनिल रेल्वेच्या दरवाजात बसलेला असताना झोपेच्या डुलकीतच त्याचा तोल गेला आणि रेल्वेतून खाली पडला. या त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू आहे.