रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या अनधिकृत दलालांवर कारवाई करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने मुंबईत गेल्या तीन दिवसांत के लेल्या कारवाईत १७१ ई तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
भाईंदर पश्चिम येथील एका औषध दुकानात आणि पूर्वेला असणाऱ्या अनिल ट्रॅव्हल्समध्ये रेल्वेच्या ई तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या दलालविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार या दोन्ही ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या वेळी १ लाख ११ हजार १७५ रुपये कि मतीची १५१ ई तिकीट जप्त करण्यात आली.
याप्रकरणी औषध दुकानाचे मालक सुशील सिंग आणि रवी ट्रॅव्हल्सचे रवी शुक्ला यांना पकडण्यात आले. गिरगावमधील व्ही.पी. रस्त्यावर असलेल्या पोस्ट कार्यालयात रेल्वेची पीआरएस खिडकी असून त्यावर प्रत्येक दिवशी सारीपत कांबळे हे रांगेत उभे राहून तिकीट घेत असत. त्यांच्याकडून शनिवारी २३ हजार ९०७ रुपये कि मतीचे २० ई तिकीट जप्त करण्यात आली आहेत. त्यांची चौकशी केली असता आयआरसीटीसीचे तीन वैयक्तिक आयडीही सापडले.