(क्रीडा)
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दुसरे सुवर्ण आणि एकूण पाचवे पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या ६७ किलो गटात सुवर्ण यश संपादन केले. त्याने स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. स्नॅचमधील पहिल्याच प्रयत्नात जेरेमीने १३६ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक पोझिशनवर आला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने १४० किलो वजन उचलून आपले स्थान भक्कम केले. जेरेमीने १४३ किलो वजनाचा तिसरा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही.
भारतीय वेटलिफ्टरने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात १५४ किलो तर दुसऱ्या प्रयत्नात १६० किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने १६४ किलो वजनाचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. मात्र, असे असतानाही त्याने सुवर्ण जिंकले. क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात जेरेमी जखमी झाला. असे असूनही तो आणखी दोनदा वजन उचलायला आला. जेरेमी लालनिरुंगा २०१८ च्या युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता आहे. यासोबतच त्याने २०२१ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
दुसरीकडे, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स ऑल राऊंडच्या अंतिम फेरीत भारतीय जिम्नॅस्ट योगेश्वर सिंगने दोन फेऱ्यांनंतर २५.५५० गुण मिळवले आहेत. त्याने पहिल्या फेरीत१२.३५० आणि दुसऱ्या फेरीत १३.२०० गुण मिळवले आहेत. तो सध्या १२ व्या स्थानावर आहेत.