(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात चार दिवसांपुर्वी (१८ जून २०२३ रात्री) भयानक प्रकार घडला. आर्थिक व्यवहारातून दहा ते बारा जणांच्या झुंडीने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर थेट अपघात विभागात घुसून हल्ला केला. या संतापजनक घटनेवरून पोलिसांनी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. संशयित परस्पर न्यायालयात हजर होणार असल्याची कुणकुण शहर पोलिसांना लागताच त्यांनी न्यायालयात ही फिल्डिंग लावली होती. परंतु, न्यायालयात जागोजागी पोलिस असल्याचे समजताच त्या संशयितांनी पळ काढला असल्याचे वृत आहे.
या हल्ल्याप्रकरणी अमेय मसुरकर, आशिष सावंत, सुमित शिवलकर, हर्षद धूळप, अभिषेक पांचाळ यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांविरोधात भा.द.वि.क. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. तर हर्षद रामचंद्र धुळप (रा. मांडवी, घुडेवठार रोड, देवरूखकर यांच्याकडे भाड्याने, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित अमोल पालकर, अक्षय नाखरेकर आणि त्यांचे भावोजी (पूर्ण नाव-पत्ता माहित नाही.) यांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील ११ संशयित फरार झाले असून, चारजण वैद्यकीय उपचार घेत आहेत.
पोलिसांची न्यायालयात फिल्डींग
सर्व कलमे जामीनपात्र असल्याने संशयितांनी परस्पर न्यायालयात हजर होण्याचे ठरवले होते. गुरुवारी सकाळपासूनच संशयित न्यायालयात हजर होण्यासाठी येणार असल्याची कुणकुण शहर पोलिसांना लागताच त्यांनी न्यायालयाच्या आवारात फिल्डिंग लावली. मात्र, न्यायालयात जागोजागी पोलिस असल्याचे समजताच न्यायालयात हजर न होताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
सामान्य लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया
रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात गुन्हेगारी आणि गुंडगिरी लक्षात घेता पोलिसांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये याआधीचे SP मोहित कुमार गर्ग यांनी केलेल्या कारवाईची यानिमित्ताने आठवण होऊन जाते. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यामध्ये कर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या पोलिसांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही सहकार्य असणे तितकेच आवश्यक आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही गुन्ह्यांतील महत्वाचेच आरोपी पोलीसांना का सापडत नाही? नेमकं या प्रकरणात चाललेय तरी काय? पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्य ओळखून तातडीने गुन्ह्यातील महत्वाच्या आरोपींना अटक करावी. अशा गुन्हेगारी आणि गुंडगिरीमुळे शहरातील परिस्थिती बिघडत चालली आहे अशा संतप्त प्रतिक्रिया सामान्य लोकांमधून उमटताना पाहायला मिळत आहे.