आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिग्स’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. सस्पेंस, ग्रीलर असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर उत्सुकता ताणणारा आहे, मात्र सध्या सोशल मीडियावर या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यावेळी महिलांवरील अत्याचार नव्हे तर पुरुषांवर होणारा हिंसाचार सिनेमाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याने अनेकांनी नाराजी प करत सिनेमाच्या बंदीची मागणी केली आहे.
आलिया मट्टया निर्माती म्हणून ‘डार्लिग्स’ हा पहिला सिनेमा आहे, मात्र तिच्या या पहिल्याच प्रयत्नात तिने अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. डार्क कॉमेडीच्या नावाखाली सिनेमात पुरुषांवरील अत्याचार दाखवण्यात आलाय, अशी तक्रार सोशल मीडियावर होत आहे. आलियाने सिनेमात केवळ अभिनयच केला नाही तर तो प्रोडयूसही केला आहे. तिने अशा सिनेमाची निर्मिती केलीय ज्यात मनोरंजनाच्या नावाखाली पुरुषांचा छळ दाखवण्यात आलाय, असे एका नेटकऱ्याने नीट केले आहे, तर दुसन्या युजरने लिहिले, पुरुषांवरील हिंसाचार ही काही साधारण गोष्ट नाही. या गोष्टीवर विनोद कसा केला जाऊ शकतो.