(राजापूर / प्रतिनिधी)
बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार्या प्रकल्पविरोधकांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये 6 जणांचा समावेश आहे.
नाणार परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प युती सरकारच्या काळात रद्द झाल्यानंतर बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात प्रकल्प होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकल्पाला ठाकरे सरकारने हिरवा कंदील दिला होता. मात्र या प्रकल्पाला बारसू, सोलगाव, गोवळ, शिवणेखुर्द परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.
काही महिन्यापूर्वी या परिसरात ड्रोन सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. या सर्व्हेक्षणालाही विरोध करण्यात आला होता. यावेळी सर्व्हेक्षणादरम्यान अधिकार्यांना अडवणे, साहित्याची नासधूस करणे, डांबून ठेवणे असे प्रकार प्रकल्पविरोधी आंदोलकांकडून झाले होते. या प्रकारामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन 6 प्रमुख पदाधिकार्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.