रिपब्लिकन सेना, मुंबईच्या वतीने 21ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता आरे बचाव मोर्चा आयोजित केला आहे. सदर मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर करणार आहेत. या मोर्चाच्या तयारी साठी मु.प्र.अध्यक्ष प्रकशभाऊ खंडागळे, रणनितिकार आणि निरीक्षक विनोद काळे यांच्या प्रमुख उस्थितीत 15 ऑगस्ट 2022 रोजी आरे कॉलनीत बैठक संपन्न झाली.
मुंबईला प्राणवायूचा पुरवठा करणारे आरे जंगल वाचलेच पाहिजे, त्यासाठी सारे पक्षभेद विसरून मुंबईकरांनी या आंदोलनात उतरावे असे आवाहन करण्यात आले आहे. मेट्रो कारशेड मुळे मुंबईची हवा प्रदूषित होऊन, आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामूळे आरे जंगल वाचणे गरजेचे आहे.
आरे जंगल वाचविण्यासाठी रिप सेनेच्यावतीने मुंबईभर जनजागृती सुरू असून त्यासाठी मुंबईचे पदाधिकारी राजेश शिनगारे, शशिकांत लिंबारे, वसंत कांबळे, प्रदीप शिंदे, सर्व जिल्हा/तालुका / वार्ड पदाधिकारी तयारी करत आहेत. तसेच मेट्रोच्या कारशेड साठी आनंदराज आंबेडकर यांनी माटुंगा व महालक्ष्मी रेल्वे कारशेड या पर्यायी जागा सुचवल्या असून लवकरच ते संबधित यंत्रणांशी संपर्क करणार आहेत. असे सांगण्यात आले आहे.
हे जनआंदोलन यशस्वी करण्यासाठी सामाजिक व सेवाभावी सर्व संस्था संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन, लोककल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेशकुमार यांनी केले आहे.