( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील चर्मालय चाररस्ता चौक येथे रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. हुजेफा महम्मद अली साखरकर (२०, रा. साखरतर रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अपघाताची घटना ४ एप्रिल २०२३ रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या- माहितीनुसार ४ एप्रिल रोजी हुजेफा हा दुचाकी घेवून कोकणनगर ते मारूती मंदीर असा जात होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो चर्मालय चार रस्ता चौक येथे आला असता परटवणे ते साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या रिक्षाला हुजेफा याच्या ताब्यातील दुचाकीने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी निष्काळजीपणे ‘वाहन चालविल्याचा ठपका ठेवत हुजेफ याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९,३३७ व मोटार वाहन • कायदा कलम १८४ नुसार गुन्हा, दाखल केला.