(चिपळूण /प्रतिनिधी)
शहरानजीकच्या खेर्डी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी रासपकडून जिल्हाध्यक्ष अशोक पवार इच्छुक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या गटातील सर्वसामान्य मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे देखील बोलले जात आहे.
खेर्डी येथील व्यावसायिक अशोक पवार गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवण्यात ते अग्रेसर असतात. दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा करतात. सध्या ते रासप जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असून या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेत असतात. यामुळे खेर्डी परिसरात त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे. यातूनच ते रासपकडून खेर्डी जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे. या गटात ते चांगले मताधिक्य घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.