(खेड)
आय सी एस महाविद्यालय खेड यांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबीर हेदली येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नशाबंदी मंडळ रत्नागिरी यांच्यावतीने मार्गदर्शन आयोजन करण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नशाबंदीची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला रत्नागिरी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक सचिन शिर्के, अंनिसचे कार्याध्यक्ष सचिन गोवळकर, जय हनुमान मित्र मंडळ हेदलीचे अध्यक्ष संदीप गोवळकर, सचिव संदिप बडबे, विविध उपक्रम कार्यवाह शैलेंद्र सकपाळ, पंकेश शिर्के, राजपाल भिडे प्राध्यापक संजय पाटोळे, एस व्ही मस्के आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांन समोर श्री. शिर्के यांनी व्यसनमुक्तीचे गीत गाऊन प्रबोधन केले. नशाबंदी चे महत्व सांगताना नशेमुळे कौटुंबिक हिंसाचारमुळे अनेक महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. रस्ते अपघात खूप वाढले आहेत.या सर्व घटनांचा सबंध वाढते व्यसन हाच असल्याचे सांगितले. भारत ही कॅन्सर ची राजधानी होवू पाहते आहे. त्याला जर रोखायचे असेल तर नशाबंदी होणे गरजेचे आहे. शेवटी प्राध्यापक संजय पाटोळे यांनी सर्वांचे आभार मानले.